News Flash

मुंबई – अहमदाबाद महामार्गावर पायपीट करत असलेल्या मजुराचा अपघातात मृत्यू

पोलिसांकडून वाहन चालकाला अटक

संग्रहित छायाचित्र

एका ४० वर्षीय मजुराचा भाईंदर येथील काशिमीरा येथील उड्डाणपुला जवळ वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई – अहमदाबाद महामार्गावरून उत्तर प्रदेशच्या दिशेने हा मजूर पायी निघाला होता.

राज्यात १७ मे पर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परराज्यातील मजूर मिळेल ती वाट धरून गावाच्या दिशेने जात आहेत. यात मोठ्या प्रमाणात अनेक मजूर हे पायपीट करतच महामार्गावरून आपल्या गावी जात असल्याचे आढळून येत आहेत.

शुक्रवारी रात्री काशिमीरा येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रस्ता ओलांडत असताना टेम्पो पीकप वाहनाच्या धडकेत ४० वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, काशिमीरा पोलिसांनी कारवाई करत वाहन चालकाला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 9:47 pm

Web Title: 40 year old man died walking on highway accident jud 87
Next Stories
1 MLC Polls : काँग्रेसतर्फे राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी
2 गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
3 महाराष्ट्रात ११६५ नवे करोना रुग्ण, ४८ मृत्यू, संख्या २० हजार २०० च्या वर
Just Now!
X