News Flash

सोलापुरातून ४०० टन फळे किसान रेल्वेने दिल्लीच्या बाजारात

किसान रेल्वे वाहतुकीचे भाडे पन्नास टक्के सवलतीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सोलापूर : करोना तथा टाळेबंदी काळात संपूर्ण देशातील ठप्प झालेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्ववत होण्याच्या दृष्टीने विशेषत: शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे उपयुक्त ठरत आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा भागातून सुमारे ४०० टन फळे किसान रेल्वेने थेट दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये पोहोचली. त्याचे कौतुक केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विटद्वारे केले आहे.

करमाळा येथील जेऊ र रेल्वे स्थानकावरून किसान रेल्वे गाडय़ांची शेतीमाल वाहतूक सुरू झाली असता स्थानिक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. त्यामुळे त्यास मोठा प्रतिसाद दिला. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून आतापर्यंत किसान रेल्वे गाडय़ांच्या ६४ फे ऱ्या झाल्या आहेत. त्यातून रेल्वेला चार कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

बंगळुरु-आदर्शनगर (दिल्ली) किसान विशेष रेल्वेगाडी सुरुवातीला मिरज-पुणे मार्गे सुरू झाली असता त्या वेळी सांगोला व करमाळा भागातील शेतकरी व व्यापाऱ्यांची मागणी विचारात घेता ही किसान रेल्वेगाडी मिरज-कुर्डूवाडी-दौंडमार्गे वळविण्यात आली. यात सांगोला रेल्वे स्थानक व करमाळा भागातील जेऊ र रेल्वे स्थानकावरून आतापर्यंत ४०० टन फळांची निर्यात दिल्लीत करण्यात आली. यात केळी, डाळिंब, द्राक्षे, बोर, पेरू आदी फळांचा समावेश आहे.

किसान रेल्वे वाहतुकीचे भाडे पन्नास टक्के सवलतीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 1:26 am

Web Title: 400 tons of fruits from solapur to delhi market by kisan railway zws 70
Next Stories
1 शीतल आमटे यांचा मृत्यू आत्महत्या की अपघात?
2 बीड जिल्ह्य़ात आणखी एका शेतकऱ्यावर बिबटय़ाचा हल्ला
3 सर्वेक्षणाचा घाट अंगलट
Just Now!
X