रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी दिवसभरात ४२६ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. ३९८ जण करोनातून पुर्ण बरे झाले. तर आठरा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १६ हजार ९६७ वर पोहोचली आहे. यापैकी १३ हजार ३२६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  जिल्ह्यात ४२६ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १७७, पनवेल ग्रामिणमधील ४४, उरणमधील १०, खालापूर २३, कर्जत ९, पेण ७६, अलिबाग २८, मरुड २, माणगाव १०, तळा २, रोहा ३८, सुधागड ३, महाड ३, पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ३, उरण ३, खालापूर १, पेण ४, अलिबाग २, मरुड २, रोहा १, श्रीवर्धन १, पोलादपूर १ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३९८ जण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ५५ हजार ६२१ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १७६ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३५७, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३५३, उरणमधील १५२, खालापूर २४८, कर्जत ९७, पेण २७५, अलिबाग २०४, मुरुड ४५, माणगाव ७४, तळा येथील ८, रोहा १७१, सुधागड १४, श्रीवर्धन १७, म्हसळा २७, महाड ११६, पोलादपूरमधील १८ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७८ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

कोव्हीड केअर सेंटर मध्ये ३८१, डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटरमध्ये ५६६, डेडिकेटेड कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये २४३ तर गृह विलगीकरणात २ हजार ४८ लोकांवर उपचार सुरु आहेत.