रायगड जिल्ह्यात दिवसभरात ४३० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यात करोनाची बाधा होऊन २०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंतची करोना रुग्णांची संख्या ही ६ हजार ४९८ इतकी झाली आहे. आज दिवसभरात २९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातल्या कोणत्या भागत किती रुग्ण आढळले त्याचा तपशील
पनवेल- १८
पनवेल ग्रामीण-४५
उरण-१८
खालापूर-३८
कर्जत-१४
पेण-५७
अलिबाग-३०
मुरुड-५
माणगाव-८
तळा-२
रोहा-२०
म्हसळा-१
महाड-१०
पोलादपूर-१
करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 10:16 pm