रायगड जिल्ह्यात बुधवारी ४३९ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ४०१ जण उपचारानंतर पुर्ण बरे झाले. दिवसभरात १५ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सध्या ३ हजार ५८१ करोनाचे रुग्ण आहेत. तर ७ हजार ६९६ रुग्ण करोना मुक्त झाले आहे. तर ३०८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या ११ हजार ५८३ वर पोहोचली आहे. ४५१ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात ४३९ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १४८, पनवेल ग्रामिणमधील ५१, उरण मधील १८, खालापूर ५३, कर्जत ९, पेण ४२, अलिबाग २५, माणगाव ११, रोहा २४, श्रीवर्धन ११, सुधागड ४, महाड ३३, पोलादपूर ५ रुग्णांचा समावेश आहे.  दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ६, पनवेल ग्रामिण २, खालापूर २, अलिबाग २, पेण २, माणगाव १, अशा १५ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४०१ जण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ३८ हजार ३६१ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५८१ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३७९, पनवेल ग्रामिण हद्दीतील ५००, उरण मधील १३९, खालापूर ३४७, कर्जत ८२, पेण ३७६, अलिबाग ३७२, मुरुड २३, माणगाव ५८, तळा येथील २, रोहा ९६, सुधागड २, श्रीवर्धन ३७, म्हसळा ६०, महाड ९४, पोलादपूरमधील १० करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६६ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

कोव्हीड केअर सेंटर मध्ये ४९३, डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटरमध्ये ५०८, डेडिकेटेड कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये १९९ तर गृह विलगीकरणात २ हजार ३७१ लोकांवर उपचार सुरु आहेत.