15 July 2020

News Flash

४४ वर्षे जुनी दुकाने जमीनदोस्त

विरोध करणाऱ्यांविरुद्ध पोलीस बळाचा वापर

विरोध करणाऱ्यांविरुद्ध पोलीस बळाचा वापर

विरार : करोनाच्या काळात वसई-विरार महापालिका आयुक्तांनी महापालिकेलगतच्या ४४ वर्षे जुन्या दुकानांवर अचानक कारवाई केल्याने दुकानदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेने मंगळवारी आठ दुकानांवर कारवाई केली आहे. विरोध करणाऱ्यांविरुद्ध या वेळी पोलीस बळाचा वापर करण्यात आला.

वसई-विरार महानगरपालिका मुख्य कार्यालयालगत मागील ४४ वर्षांपासून २५ हून अधिक दुकाने आहेत.  १९७५ पासून ही दुकाने सुरू आहेत. तत्कालीन नगरपरिषदेने या दुकानांना ३० वर्षांची मुदत दिली होती. त्यानंतर या दुकानदारांनी कायमस्वरूपी परवानगीसाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते. पण अद्यापही यावर कोणताही निर्णय झाला नाही.

नव्याने नियुक्त झालेल्या आयुक्तांनी मागील आठवडय़ात करोना महामारीचा काळ सुरू असतानाही या दुकानांना खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्या अनुषंगाने कारवाई करत त्यांनी यातील आठ दुकाने जमीनदोस्त केली. या वेळी दुकानदारांचा मोठा विरोध झाल्याने त्यांनी पोलीस बळाचा वापर करत ही दुकाने तोडली. इतर दुकाने ११ जून रोजी तोडण्यात येणार आहेत.

आम्ही दोन पिढय़ांपासून हे दुकान चालवत आहोत. आमचा कधीही कुणाला त्रास झाला नाही. असे असतानाही आमच्यावर झालेली कारवाई हा मोठा अन्याय आहे. आम्हाला आमचे समान काढण्याची संधीसुद्धा दिली नाही. यामुळे आमचे लाखोंचे नुकसान झाले.

– विजय जैन, दुकानदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:19 am

Web Title: 44 year old shop demolished zws 70
Next Stories
1 अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे
2 शेतकरी नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
3 ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागमध्ये धडकणार
Just Now!
X