गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसाने मे महिना उजाडला तरी राज्यात यंदा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवलेले नाही. जलाशयांमध्ये एकू ण क्षमतेच्या ४५ टक्के  साठा शिल्लक असून,  अद्याप तरी काही अपवाद वगळता पाण्याची टंचाई जाणवलेली नाही.

टँकर्सची  वाढती मागणी, पाण्याची पळवापळव, वीज भारनियमन, पाण्यासाठी वणवण,  भटकणारी जनता हे साधारण राज्यात मे महिन्यात चित्र असते. पण गेली दोन वर्षे चांगल्या पावसाने राज्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नाही वा टँकर्सची संख्याही घटली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारने कठोर निर्बंध लागू के ल्याने राज्याच्या बहुतांशी भागातील व्यवहार ठप्पच आहेत. उद्योग बंद असल्याने विजेची मागणी घटली. तर पिण्याच्या पाण्याची तेवढी दाहकता जाणवत नाही. आजच्या घडीला राज्यात एकू ण क्षमतेच्या ४५ टक्के  साठा शिल्लक होता. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील जलाशयांमध्ये ४२.४९ टक्के  साठा शिल्लक होता. पाणी जलाशयांमध्ये उपलब्ध असल्याने १५ जूनपर्यंत तरी पाण्याची समस्या जाणवणार नाही, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी मराठवाडय़ात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र समस्या जाणवते. काही वर्षांपूर्वी लातूरला रेल्वे गाडीने पाणी आणावे लागले होते. जायकवाडीने तळ गाठल्याने राखीव पाण्याचा साठा वापरावा लागला होता. यंदा मात्र मराठवाडय़ात क्षमतेच्या ४७ टक्के  साठा अद्यापही उपलब्ध आहे. विभागनिहाय आढावा घेतल्यास तुलनेत पुणे विभागात पाणीसाठा कमी आहे. कोकणात निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी पडलेल्या चांगल्या पावसाने सारे जलाशय चांगले भरले होते. लागोपाठ दुसऱ्या वर्षी पाण्याची तेवढी तीव्रता जाणवलेली नाही. गेल्या वर्षीही पाण्याची एवढी समस्या जाणवली नव्हती. जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा असल्याने टँकरची मागणी वाढलेली नाही. काही ठिकाणी पाणीपुरवठा होण्यात तांत्रिक अडचणी आहेत तेथे टँकर्सने पाणी पुरवावे लागते. काही ठिकाणी टँकर लॉबीच्या दबावामुळे टँकसची मागणी वाढली आहे.

मुख्य जलाशयांमधील साठा

जायकवाडी ४८ टक्के , मांजरा ८१ टक्के , निम्न तेरणा ५४ टक्के , भातसा ४३.७६ टक्के , निळवंडे ४५ टक्के , भंडारदरा ५५ टक्के , भीमा उजनी ८ टक्के , बारवी ५६ टक्के , कोयना ४४ टक्के .

 

विभागनिहाय पाणीसाठा

कोकण – ५०.१२ टक्के

पुणे – ३८.६४ टक्के

अमरावती – ५१.५९ टक्के

नागपूर – ५१.७ टक्के

नाशिक – ४७.३५ टक्के

औरंगाबाद – ४६.९१ टक्के