रायगड जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी दिनांक १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. एकूण २० लाख ४३ हजार ३४६ मतदार असून, १९ लाख ३४ हजार २४ मतदार ओळखपत्रधारक आहेत.
अंतिम यादीमध्ये नव्याने ४५ हजार २१६ मतदारांची वाढ झाली आहे. त्यात महिला २२ हजार ४४८ व २२ हजार ७६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. एकूण ७२० महिला मतदारांमध्ये घट झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पनवेल, कर्जत, उरण, पेण, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. पनवेल मतदारसंघामध्ये एकूण चार लाख ४७ हजार १८४ मतदार असून, चार लाख २६ हजार ४५६ मतदार ओळखपत्रधारक आहेत. कर्जतमध्ये दोन लाख ५० हजार ५५९ मतदार असून, दोन लाख ४३ हजार ७२१ ओळखपत्रधारक आहेत. पेणमध्ये दोन लाख ८८ हजार २३३ मतदार आहेत. त्यात दोन लाख ८३ हजार २९९ ओळखपत्रधारक आहेत. अलिबागमध्ये दोन लाख ७७ हजार ४२९ मतदार आहेत. त्यात दोन लाख ६७ हजार ५०० ओळखपत्रधारक आहेत.
श्रीवर्धनमध्ये दोन लाख ४३ हजार ५८९ मतदार आहेत. त्यात दोन लाख ३७ हजार १६ ओळखपत्रधारक आहेत. महाड मतदारसंघात दोन लाख ६८ हजार ४४१ मतदार आहेत. त्यात दोन लाख ५५ हजार ५९२ ओळखपत्रधारक मतदार आहेत. एकूण जिल्ह्यामध्ये २२ लाख ४० हजार ३४६ मतदार आहेत. त्यात १९ लाख ३४ हजार २४ ओळखपत्रधारक असून, एक लाख सहा हजार ३२२ मतदार ओळखपत्रापासून वंचित असल्याचे दिसून आले आहे.
१६ जानेवारी रोजी झालेल्या मतदार याद्यांच्या अंतिम यादीमध्ये ४५ हजार २१६ मतदार नव्याने वाढले आहेत. त्यात २२ हजार ७६८ पुरुष व २२ हजार ४४८ स्त्रिया मतदार आहेत. पुरुष मतदारांमध्ये वाढ झाली असून, ७२० महिला मतदारांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आहे.