09 August 2020

News Flash

वाडिया रुग्णालयायासाठी ४६ कोटी देणार, अजित पवार यांचं शर्मिला ठाकरेंना आश्वासन

शर्मिला ठाकरे यांनी सोमवारीही वाडिया रुग्णालय प्रश्नी आंदोलन केलं होतं

वाडिया रुग्णालयासाठी ४६ कोटी देणार असल्याचं आश्वासन आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं असल्याचं मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. वाडिया रुग्णालयाचा प्रश्न शर्मिला ठाकरे यांनी लावून धरला आहे. कालही त्यांनी हे रुग्णालय वाचवा ही मागणी करत आंदोलन केलं होतं. आज त्यांनी याच प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार आणि शर्मिला ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर वाडिया रुग्णालयासाठी अजित पवार ४६ कोटी देणार असल्याचं शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

राज्य सरकार आणि महापालिकेकडून मिळणारे अनुदान थकीत असल्याचं कारण देत वाडिया रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णालयं बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र या प्रकरणात मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी लक्ष घातलं. हे रुग्णालय बंद होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. शर्मिला ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर

वाडिया वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

वाडिया रुग्णालयाला राज्य शासनाकडून ४४ कोटी तर मुंबई महापालिकेकडून २२ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय बंद होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

परळमधील पालिकेच्या जमिनीवर वाडिया रुग्णालय सुरू करण्यात आले. १९२६ आणि १९२८ या वर्षी राज्य सरकार, वाडिया आणि पालिका यांच्यात करार झाला होता. त्यानुसार या विभागातील गिरणी कामगारांच्या कुटुंबासाठी ५० टक्के खाटा राखीव ठेवून त्यांना मोफत उपचार देण्याची अट घालण्यात आली होती. आता गिरणी कामगार नसले तरी गेल्या काही वर्षांत किती गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले याची आकडेवारी रुग्णालय प्रशासन सादर करीत नाही. तसेच केवळ १२०-१२० खाटांपासून सुरू झालेल्या या रुग्णालयात सध्या ३०० आणि ३०७ खाटा आहेत. राज्य सरकार किंवा पालिकेच्या परवानगीशिवाय खाटांची संख्या वाढवण्यात आल्याचा आरोपही पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 6:30 pm

Web Title: 46 crore for wadia hospital ajit pawars assurance to sharmila thackeray scj 81
Next Stories
1 “प्रामाणिक प्रयत्न कर, लागेल ती मदत करतो”, चणे-फुटाणे विकून शिक्षण घेणाऱ्या तरुणाला उद्धव ठाकरेंचा शब्द
2 उदयनराजेंना भाजपासमोर लोटांगणाशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक
3 शिवस्मारक अरबी समुद्रात नको तर जमिनीवर बांधा, मराठा सेवा संघाची मागणी
Just Now!
X