14 August 2020

News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाचे ४६४ नवे रुग्ण

५१२ जण करोना मुक्त, १२ जणांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची चिन्ह दिसून येत नाहीत. गुरुवारी दिवसभरात ४६४ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ५१२ जण उपचारानंतर पुर्ण बरे झाले. दिवसभरात १२ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६६३ करोनाचे रुग्ण आहेत. तर ८ हजार ४७२ रुग्ण करोना मुक्त झाले आहे. तर ३३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १२ हजार ४५९ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ४६४ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १५८, पनवेल ग्रामिण मधील ३८, उरण मधील २९, खालापूर ४६, कर्जत १२, पेण ५६, अलिबाग ३४, माणगाव ९, रोहा १९, सुधागड ४, श्रीवर्धन १, म्हसळा ४, महाड ४३ पोलादपूर ४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ६, पनवेल ग्रामीण १, उरण १, खालापूर १, महाड २, अशा १२ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५१२ जण करोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ४१ हजार ०८८ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ६६३ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३८२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४६६, उरण मधील १६२, खालापूर ३८५, कर्जत ९२, पेण ३४१, अलिबाग ३७४, मुरुड ४२, माणगाव ७०, तळा येथील २, रोहा १०९, सुधागड १०, श्रीवर्धन २८, म्हसळा ५५, महाड १३१, पोलादपूर मधील १४ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६८ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 10:10 pm

Web Title: 464 new corona cases in raigad district scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 ग्रामपंचायतींवरील प्रशासक नेमणुकींच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
2 खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याला कारागृहातून गावी नेऊन केली पार्टी
3 चंद्रपूर शहरात शनिवारपासून लॉकडाउन नाही
Just Now!
X