27 November 2020

News Flash

रायगड जिल्ह्य़ात ४७५ करोनाचे नवे रुग्ण, ३४६ करोनामुक्त

जिल्ह्यात ४७५ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे

(प्रतिकात्मक छायाचित्र)

रायगड जिल्ह्यातील करोनाचा आलेख पुन्हा उंचावण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात करोनाचे ४७५ नवे रुग्ण आढळून आले. तर ३४६ जण करोना मुक्त झाले. तर ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २६ हजार ०७४ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ४७५ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील २४६, पनवेल ग्रामिणमधील ७१, उरणमधील १३, खालापूर २०, कर्जत ७, पेण २१, अलिबाग २८, मुरुड १, माणगाव २, तळा ०, रोहा २८, सुधागड १२, श्रीवर्धन ०, म्हसळा ०, महाड ४, पोलादपूर २२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ३, उरण २, खालापूर २, पेण १, अलिबाग १, तळा १, रोहा १ अशा एकुण ११ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३४६जण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील ९१ हजार ७४१ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार १५९ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार १४२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४६४, उरण मधील १७८, खालापूर १६९, कर्जत ८८, पेण १८४, अलिबाग २९३, मुरुड १८, माणगाव ११७, तळा येथील ८, रोहा २४१, सुधागड ४४, श्रीवर्धन २२, म्हसळा १७, महाड १३२, पोलादपूर मधील ४२ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ८५ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 12:07 am

Web Title: 475 corona new patients in raigad district 346 corona free abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 परतीच्या प्रवासासाठी कोकणरेल्वेला मोठा प्रतिसाद
2 आपत्ती व्यवस्थापनातील त्या ‘तिघी’
3 फडणवीसांनी कॅलक्युलेशन समजून घ्यावं, जनता त्यांच्याकडे…; रोहित पवारांनी दिलं प्रत्युत्तर
Just Now!
X