एव्हीएच केमिकल कंपनीच्या जाळपोळ, मोडतोडप्रकरणी गुरुवारी आणखी चोवीस जणांना अटक करण्यात आली. आतापर्यंत याप्रकरणी ४९ जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एव्हीएच कंपनीच्या रासायनिक प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात ७ मार्च रोजी जनक्षोभ उसळला होता. या दिवशी झालेल्या आंदोलनाला िहसक वळण मिळाले हाते. कंपनीचे कार्यालय प्रकल्पाची जाळपोळ करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांना कोंडून घालण्यात आले हाते. याप्रकरणी कंपनीच्या वतीने चंदगड पोलीस ठाण्यामध्ये तीन वेगवेगळय़ा फिर्यादी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू ठेवला.
पोलिसांनी पहिल्या टप्प्यामध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाबूळकर, प्रा. एन. एस. पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर, संजय पाटील, दीपक चांदेकर, शिवाजी सावंत, मंजुळा नाईक, दुर्गा नाईक यांच्यासह पंचवीस जणांना बुधवारी अटक केली होती. त्यांच्याविरोधात ३५६ कलम दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चंदगड पोलिसांनी गुरुवारी आणखी चोवीस जणांना अटक केली. त्यामध्ये गणेश पाटक, दामोदर वेदण, श्रीशैल नागराळे, बाबुराव हळदणकर आदींचा समावेश आहे. या सर्वाच्या विरोधात ३३६, ३३५ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वाची सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली.