News Flash

महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक! दिवसभरात ५ लाख ५२ हजार जणांचे झाले लसीकरण

राज्यात आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आजपासून सर्व प्रौढांना करोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. तसेच, राज्यात आज ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.

यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, अशी देखील डॉ. व्यास यांनी माहिती दिली आहे.

COVID-19 : राज्यात आज ९ हजार ४३ रूग्ण करोनामुक्त, तर ८ हजार ४७० नवे करोनाबाधित

तर, केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाचे मोफत लसीकरण करण्यासाठी आजपासून ‘सर्वासाठी मोफत लसीकरण मोहीम’ सुरू केली आहे. या मोहिमेचा सर्वाधिक लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणाईला होईल. आपण सर्वानी लसीकरणाची प्रतिज्ञा करू या. आपण संघटितपणे करोनाचा पराभव करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

COVID-19 vaccination in india : लसीकरणाचा विक्रम

सर्वासाठी मोफत लसीकरण मोहिमेनुसार केंद्राकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या, लसीकरणातील प्रगती आदी निकषांनुसार लसामात्रा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या मोहिमेत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 9:14 pm

Web Title: 5 lakh 52 thousand people were vaccinated today in maharashtra msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 COVID-19 : राज्यात आज ९ हजार ४३ रूग्ण करोनामुक्त, तर ८ हजार ४७० नवे करोनाबाधित
2 महाराष्ट्रातील करोनामुक्त गावांमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग पुन्हा सुरू होणार?
3 “मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाहीये”, मुनगंटीवारांचा शरद पवारांवर निशाणा!
Just Now!
X