जिल्हा रुग्णालयात डोळ्यांवरील शस्त्रक्रियेनंतर पाचजणांना संसर्ग झाल्याने त्यांची दृष्टी अधू झाली असून त्यांना तातडीने मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले. अधिष्ठाता नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी शनिवारी पहाटे त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केल्याने त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात गुरुवारी डॉ. राधेश्याम जाजू यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १६ जणांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर पाचजणांना शुक्रवारी त्रास होऊ लागला व डोळ्यांमध्ये पाणी आले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याबाबत गुप्तता पाळली. मात्र, आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली व लातूरच्या आरोग्य उपसंचालक साधना तायड रविवारी रुग्णालयास भेट देऊन  या बाबत चौकशी केली. दुपारी आरोग्य राज्यमंत्री डॉ. सावंत आणि डॉ. लहाने यांनी भेट देऊन नेत्र शस्त्रक्रिया विभागाची पाहणी केली.