सोलापुरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैरागजवळील राळेरास येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. जखमीतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातेय. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बार्शीकडून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसने (MH 14 BT 3775) राळेरासमध्ये जीपला धडक दिली. यामध्ये जीपाचा चक्काचुर झाला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की जीपचा पुढील भाग पुर्णपणे चेपला गेला.  यातील मृत व काही जखमी हे बार्शी तालुका पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी आहेत. आज सोलापुरात बचत गटांतर्गत उडान अभियान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण बार्शी येथून सोलापूरकडे येत होते. सोलापूर-बार्शी हा सुमारे ८० किलोमीटर अंतराचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे खूपच जिकारीचे होते.

सोलापूर-बार्शी या रस्त्याची दुरावस्ता झाली आहे. रस्ता अतिशय खराब झाला असून त्यासाठी सतत आंदोलन सुरू असतात. रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं, यासाठी स्थानिकांनी अनेक निवेदनही दिलं आहे. पण प्रत्यक्षात रस्त्याचं काम सुरू झालं नाही.

मृतांची नावे-

१) छगन लिंबाजी काळे (वय ३४, रा. पानगाव, ता. बार्शी)
२) संदीप पांडुरंग घावटे (वय -२३, रा. पांढरी, ता. बार्शी)
३) देवनारायण महादेव काशीद (वय ४४, रा. कव्हे’ ता. बार्शी)
४) संभाजी जनार्दन महिंगडे वय. ४९, रा. बार्शी
५) राकेश अरुण मोहरे वय ३२ रा. बार्शी

गंभीर जखमींची नावे-

१) शुभांगी बांडवे (वय ३५, रा. बार्शी)
२) वर्षा रामचंद्र आखाडे (वय ३५ रा. बार्शी)
३) नीलकंठ उत्तरेश्वर कदम (वय ३४, रा. पांगरी, ता. बार्शी)
४) कविता भगवान चव्हाण (वय ३१, रा. अलीपूर, ता. बार्शी)
५) नरसिंह महादेव मांजरे( वय ५५, रा. देगाव, ता. बार्शी)
६) रागिणी दिलीप मोरे ( वय २९, रा. बार्शी)
७) आण्णासाहेब ज्योतीराम जाधव ( वय ३१, रा. चिखर्डे, ता. बार्शी )