News Flash

मातृदिनी आईसह चिमुकल्याचा बुडून मृत्यू

पाणी जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे माय-लेकराचा बुडून मृत्यू झाला

प्रतिनिधिक छायाचित्र

बीड : गोदावरी नदी पात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या आईसह चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे रविवारी घडली. पाच वर्षांचा मुलगा बुडत असल्याचे पाहून आईने पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. मातृत्वदिनीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

संगम जळगाव येथील पल्लवी गोकुळ ढाकणे (वय २६) या मुलगा समर्थ (वय ५) याला सोबत घेऊन गोदावरी नदी पात्रावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धूत असताना समर्थ खेळता खेळता पाण्यात बुडू लागला. डोळ्यादेखत मुलगा बुडत असल्याचे पाहून पल्लवी ढाकणे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र पाणी जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे माय-लेकराचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 12:40 am

Web Title: 5 year old boy and mother drowned to death on mother s day in godavari river zws 70
Next Stories
1 Coronavirus : राज्यात आज ६० हजार २२६ रूग्णांची करोनावर मात ; रिकव्हरी रेट ८६.४ टक्के
2 ताडोबातील वाघाला अर्धांगवायूचा झटका; निपचीत पडून असल्याचा आढळला!
3 तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाची सज्जता – डॉ. प्रदीप व्यास
Just Now!
X