23 September 2020

News Flash

श्रीरामपूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार? संशयास्पद मृत्यूमुळे शहर बंदची हाक

ही बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक होत श्रीरामपूर बंदचे आवाहन केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा उपचारांदरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे ही घटना घडलेल्या गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून नागरिकांनी श्रीरामपूर शहर बंदची हाक दिली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे ही घटना घडली आहे. मृत चिमुकली घरी परतल्यानंतर तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यामुळे तिला तातडीने श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तिचा मृतदेह औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर या मृत्यूबाबतचे सत्य समजू शकेल.

या चिमुरडीचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत स्पष्टता नसली तरी तिच्या नातेवाईकांनी अत्याचार झाल्याचा दावा करीत अत्याचार करणाऱ्याला नराधमाला फाशी देण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्राही त्यांनी घेतला आहे.

ही बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक होत श्रीरामपूर बंदचे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:43 pm

Web Title: 5 year old girl raped in shrirampur call of shutdown city due to suspicious death
Next Stories
1 फडणवीस सरकारसमोर रोकड संकट; शिर्डी देवस्थान ट्रस्टकडून घेतले ५०० कोटींचे कर्ज
2 पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत दोन शाळकरी मुलांचा मृत्यू 
3 ‘पुल’कित आठवणींचा भरजरी सोहळा!
Just Now!
X