विरारमध्ये 50 वर्षीय महिला व एका रिक्शा चालकाची भर रस्त्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ वायरल झाला आहे. विरार पश्चिम अग्रवाल सिटी परिसरातील रिक्शा थांब्यावर काल, गुरुवारी दुपारच्या वेळी ही घटना घडली. हाणामारीत महिलेने खुलेआम हातात चाकू घेऊन रिक्शा चालकावर वार केल्याचे दिसून येते आहे.

मंजिती कौर भोसले हातात चाकू घेऊन वार करणाऱ्या महिलेचे नाव आहे तर दुर्गेश पाटील जखमी रिक्शा चालकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारच्या वेळेस अग्रवाल सिटीच्या सर्कलवर महिलेची दुचाकी आणि रिक्शा सामोरा समोर आल्याने अपघात होता होता राहिला होता.त्यावरुन महिलेचा आणि रिक्शा चालकामध्ये वाद निर्माण झाला.

अखेर याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडणामध्ये महिलेने चाकूने वार केला आणि रिक्शा चालकाने हाताने मारहाण केली असता, यामध्ये रिक्शा चालक चाकूच्या हल्ल्यात जखमी झाला आहे.या प्रकरणी दोघांच्या विरुद्धात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्शा चालकाच्या तक्रारी वरुन 324 दखल पात्र महिलेवर तर महिलेच्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.