02 March 2021

News Flash

‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या या ५१ शाखा होणार बंद

बंद झालेल्या शाखांचे इतर शाखांत होणार विलीनीकरण

बँक ऑफ महाराष्ट्रचे संग्रहित छायाचित्र

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने देशभरातील ५१ शाखा बंद करण्याता निर्णय घेतला आहे. या शाखा बंद होणार असल्या तरीही त्यांचे अन्य शाखांमध्ये विलीनीकरण होणार असल्याचे बँकेने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील पाच शाखांचा समावेश आहे. या विलीनीकरणामुळे बंद झालेल्या या शाखांचे आयएफएससी कोड व मायकर कोड बंद केले जाणार आहेत. ३१ डिसेंबरपासून या शाखांचे आयएफएससी कोड आणि मायकर कोड बंद केले जाणार आहेत. विलीन किंवा बंद झालेल्या शाखांमधील ग्राहकांची खाती संबंधित शाखा ज्या शाखेमध्ये विलीन करण्यात आली आहे त्या शाखेमध्ये सुरू ठेवली जाणार आहेत. जुन्या शाखांचे आयएफएससी कोड आणि मायकर कोड बँकेच्या कार्यप्रणालीतून काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे खातेदारांनी जुने कोड वापरू नयेत. तसेच या विलीनीकरणामुळे बंद झालेल्या शाखांची जुनी चेकबुकदेखील ग्राहकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी बदलून घ्यावीत, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

बँकेच्या विलीन करण्यात आलेल्या शाखांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील नेरे, विंझर, सेल्फ हेल्प ग्रुप, पुणे पेन्शन पेमेंट आणि ससून रस्ता आशा पाच शाखांचा समावेश आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमानुसारच ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असे बँकेच्या प्रसिद्धी विभागातर्फे सांगण्यात आले. आता अशाप्रकारे शाखा बंद करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत ते मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पुण्याशिवाय इतर शहरांतील शाखाही बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३५ शाखांचा समावेश आहे. तर इतर १६ शाखा या बाकी राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रातील शाखांची यादी खालीलप्रमाणे

– मुंबई, कॉटन
– सोलापूर, सोलापूर शिवशाही
– मुंबई, सिनिअर सिटीझन
– कोल्हापूर, कोल्हापूर खासबाग
– अमरावती, राजपेठ अमरावती
– मुंबई, वांद्रे पश्चिम
– ठाणे, अलयाली इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स
– पुणे पूर्व, नेरे
– पुणे पूर्व, विनझार
– मुंबई, डॉ. अॅनी बेझंट रोड ब्रँच
– जळगाव, गणपतीनगर
– लातूर, पीपल कॉलेज कॅम्पस बीआर. नांदेड
– ठाणे, एपीएमसी वाशी
– नागपूर, नागपूर यशवंत
– लातूर, योगेश्वरी ब्रँच
– नाशिक, हल टाऊनशिप, ओझर
– पुणे सिटी, पेन्शन पेमेंट
– पुणे सिटी, ससून रोड पुणे
– मुंबई, कॉर्पोरेट फायनान्स
– पुणे पूर्व, एसएचजी पुणे
– सातारा, एसएचजी सातारा
– नागपूर, मिड कॉर्पोरेट ब्रँच नागपूर
– सातारा, मिड कॉर्पोरेट ब्रँच सातारा
– नाशिक, मिड कॉर्पोरेट ब्रँच नाशिक
– ठाणे, वसई पश्चिम
– जळगाव, दत्ता मंदिर चौक, धुळे
– ठाणे, नालासोपारा पूर्व
– ठाणे, विरार पूर्व
– अमरावती, अर्जुन नगर
– ठाणे, बोईसर
– मुंबई, एसएचजी मुंबई
– ठाणे, एसएचजी ठाणे
–  नाशिक, एसएचजी नाशिक
– औरंगाबाद, एसएचजी ब्रँच
– औरंगाबाद, एसएचजी जालना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 3:49 pm

Web Title: 51 branches of bank of maharashtra are merging list of 35 in maharashtra
Next Stories
1 धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलीवर केला बलात्कार
2 हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम टाटा-सिमेन्सला
3 सीएनजी दराचा भडका
Just Now!
X