14 August 2020

News Flash

महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ मृत्यू

३ हजार २९६ रुग्णांना गेल्या चोवीस तासांमध्ये देण्यात आला डिस्चार्ज

महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ नव्या मृ्त्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील २ लाख १७ हजार १२१ एवढी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६ टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. तर ४५ हजार ४५३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यात ८९ हजार २९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये ५ हजार १३४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या २ लाख १७ हजार १२१ इतकी झाली आहे.

प्रमुख शहरांमधली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई -२३ हजार ३५९
ठाणे- २९ हजार ९८८
पुणे – १४ हजार ८९२
नाशिक-२३००
औरंगाबाद-३५०६
नागपूर-४५२

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर मुंबईपेक्षा ठाण्यातील अॅक्टिव्ह केसेस वाढलेल्या दिसत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी १२ जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनचा किती परिणाम होतो ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

काय उपाय करा?

बाहेर पडताना मास्क लावा

गरज असेल तरच बाहेर पडा

बाहेरुन आल्यानंतर सॅनेटायझर वापरा

हात वारंवार स्वच्छ धुवा

ही सगळी आवाहनं महापालिकांकडून करण्यात आली आहेत. तसंच सरकार आणि प्रशासनाकडूनही हे वारंवार सांगण्यात आलं आहे. करोनाला घाबरु नका मात्र काळजी आवर्जून घ्या असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:04 pm

Web Title: 5134 new covid19 positive cases 3296 discharged and 224 deaths in maharashtra today scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 सातारा : २५ लाखांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास अटक
2 उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या
3 “दोन मित्र अंधारातून चालताना धीर देतात, भूत बित काही नाही बरका”
Just Now!
X