लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यात करोनामुळे आत्तापर्यंत ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या १९ हजार २९८ वर पोहोचली आहे. यातील १५ हजार ३३५ उपचारानंतर  बरे झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात ३७६ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. २९१ जण करोनातून  बरे झाले तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात ३७६ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १७९, पनवेल ग्रामिण मधील २६, उरण मधील २५, खालापूर २०, कर्जत ८, पेण ३३, अलिबाग ४१, मरुड २, माणगाव ९, तळा ०, रोहा १२, सुधागड ७, श्रीवर्धन १, म्हसळा २, महाड ८, पोलादपूर ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ४, पनवेल ग्रामीण १, खालापूर १, महाड १, पोलादपूर येथे १ अशा एकुण ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात २९१ जण करोनातून  बरे झाले आहेत.

nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

जिल्ह्यातील ६४ हजार ७१४ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४३९ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ६११, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३४१, उरण मधील १४०, खालापूर २१३, कर्जत ७२, पेण २६८, अलिबाग २३४, मुरुड २२, माणगाव ८४, तळा येथील १०, रोहा २५५, सुधागड ३३, श्रीवर्धन १५, म्हसळा १४, महाड ११७, पोलादपूर मधील १० करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७९ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.