महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊन आता दोन महिने होत आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी कामाचा धडाकाही लावला आहे. पण, त्यांच्या या कामगिरीवर किती टक्के लोक समाधानी आहेत? असा प्रश्न राज्यातील जनतेला विचारण्यात आला. त्याचं उत्तर आता मिळालं आहे.
देशातील मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्व्हे केला होता. अनेक राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील जनतेलाही काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील एक प्रश्न होता, मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी ? यावर लोकांनी दिलेला कौल असा होता : २८ टक्के लोकांनी खूप समाधानी असल्याचे सांगितले. ३१ टक्के लोक समाधानी होते. म्हणजेच एकूण ५९ टक्के उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर समाधानी होते. ४१ टक्के लोकांनी सांगितले की ते उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर असमाधानी आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. काही कामांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचा परिणाम लोकांच्या मनावर झाल्याचे या सर्व्हेतून दिसून येते.
साच प्रश्न इतर काही राज्यांतील जनतेलाही विचारण्यात आला होता. त्यापैकी केजरीवाल यांच्या नावाला सर्वाधिक पसंती होती. दिल्लीतील ५९ टक्के लोकांनी केजरीवाल यांच्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचं दिसून आलं आहे. केवळ १७ टक्के लोक केजरीवालांच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचं या सर्व्हेमध्ये आढळलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर किती समाधानी ?
मुख्यमंत्री | खूप समाधानी | समाधानी | असमाधानी |
योगी आदित्यनाथ | 39 टक्के | 26 टक्के | 35 टक्के |
अरविंद केजरीवाल | 59 टक्के | 24 टक्के | 17 टक्के |
नितीश कुमार | 44 टक्के | 30 टक्के | 26 टक्के |
उद्धव ठाकरे | 28 टक्के | 31 टक्के | 41 टक्के |
ममता बनर्जी | 67 टक्के | 2 टक्के | 31 टक्के |
अशोक गहलोत | 28.6 टक्के | 44.6 टक्के | 27 टक्के |
कमलनाथ | 18 टक्के | 46 टक्के | 36 टक्के |
मनोहरलाल खट्टर | 22 टक्के | 23 टक्के | 55 टक्के |
(एबीपी न्यूज, सी व्होटरचा सर्व्हे)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 1:22 pm