26 October 2020

News Flash

सांगलीच्या आश्रमशाळेतील ६ विद्यार्थिनींवर संस्थाचालकांकडून अत्याचार

संस्थाचालक आणि महिला शिपायाला चौकशीसाठी घेतले ताब्यात

संग्रहीत छायाचित्र

सांगलीच्या वाळवा तालुक्यात असलेल्या आश्रमशाळेतील ६ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. कुरपळ येथे असलेल्या मिनाई आश्रम याठिकाणी ही घटना घड़ली असून याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आली आहे. अरविंद पवार असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकांचे नाव आहे. पवार यांनीच या सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पवार यांना या प्रकरणी मदत केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी येथील मनिषा कांबळे या महिला शिपायाला ताब्यात घेतले आहे. या महिलेकडे प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या शाळेत ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ७० मुली राहतात. यातील ५ मुलींनी आपल्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार केली असून ३ मुलींनी विनयभंगाची तक्रार केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे उपअधिक्षक किशोर काळे यांनी सांगितले. अशाप्रकारे शाळेतच मुली सुरक्षित नसतील तर काय करायचे असा प्रश्न पालकांसमोर उभा राहीला आहे. या घटनेमुळे येथील पालक आणि विद्यार्थिनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्ण चौकशी झाल्यानंतरच नक्की काय घडले ते समोर येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 8:40 pm

Web Title: 6 girls in sangli kurpal ashram shala sexually abuse by director
Next Stories
1 कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या जावांचा बुडून मृत्यू
2 राफेल डीलमध्ये मोदी फसणार नाहीत, शरद पवारांना विश्वास
3 Video : देव तारी…अंगावरुन गाडी जाऊनही मुलगा सुखरुप
Just Now!
X