रायगड जिल्ह्य़ात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ६३.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेण, पनवेल, उरण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले.  गेल्या चोवीस तासांत अलिबागमध्ये ५७ मिमी, पेण- १२६ मिमी, मुरुड- ५१ मिमी, पनवेल- ८० मिमी, उरण- ८४ मिमी, कर्जत- ७६.३ मिमी, खालापूर- ६६ मिमी, माणगाव- ३५ मिमी, रोहा- ३९ मिमी, सुधागड पाली- ६७ मिमी, तळा- ४३ मिमी, महाड- ३२ मिमी, पोलादपूर- ६१ मिमी, म्हसळा- ४५ मिमी, श्रीवर्धन- ७७ मिमी, माथेरान- ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.  दरम्यान येत्या चोवीस तासांत उत्तर कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.