20 September 2020

News Flash

रायगडमध्ये करोनाचे ६४६ नवे रुग्ण

जिल्ह्यात सध्या ६ हजार ५६४ करोनाचे अँक्टीव रुग्ण आहेत

(संग्रहित छायाचित्र)

रायगड जिल्ह्यात दिवसभरात करोनाचे ६४६ नवे रुग्ण आढळून आले. उपचारानंतर ६५९ जण बरे झाले. तर १५ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ३८ हजार ४१९ वर पोहोचली आहे. यापैकी ३० हजार ८१८ रुग्ण करोनातून पुर्ण बरे  झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ६ हजार ५६४ करोनाचे अँक्टीव रुग्ण आहेत. तर १०३७ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ६४६ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यात पनवेल मनपा हद्दीत २१५, पनवेल ग्रामिण ६८, उरण १४, खालापूर २८, कर्जत ३१, पेण ४४, अलिबाग ८१, मुरुड १३, माणगाव ५३, तळा ४, रोहा ४७, सुधागड १२, श्रीवर्धन २, म्हसळा ४, महाड १८, पोलादपूर येथील १२ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या ६ हजार ५६४ करोनाचे रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील २ हजार १४४,  पनवेल ग्रामिण ८७६, उरण २१८, खालापूर ३३५, कर्जत २२१, पेण ५४९, अलिबाग ८१८, मुरुड ७२, माणगाव ३६४, तळा ४३, रोहा ४९७, सुधागड ६४, श्रीवर्धन ६३, म्हसळा ३७, महाड २२२, पोलादपूर येथील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे, तर मृत्यूदर ३ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२.३ आहे. ४ हजार ६०० जणांवर गृहविलगिकरणात उपचार सुरु आहेत. २१५ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत असून तर १८ जण कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:10 am

Web Title: 646 new corona patients in raigad abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण
2 न्यायालयाची जुनी इमारत करोना रुग्णांवरील उपचारांसाठी मिळावी म्हणून जलसमाधी आंदोलन
3 मराठा आरक्षणावरील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार, म्हणाले…
Just Now!
X