जिल्ह्य़ात विविध प्रकारांतील २ लाख १७ हजारांहून अधिक विविध प्रकारांतील वीज ग्राहकांकडे जवळपास ७ अब्ज रुपये थकबाकी आहे. पैकी कृषीपंपधारकांकडील थकबाकी ६ अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे.
जिल्ह्य़ात कृषिपंप वीज जोडण्यांची संख्या जवळपास १ लाख ५ हजार आहे. सध्या साडेसहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे कृषी पंप जोडणीचे अर्ज महावितरणकडे प्रलंबित आहेत. चालू वर्षी ८ हजार ३७२ कृषी पंपांना वीजजोडणी देण्यास निविदा काढण्यात आल्या. पैकी साडेसहा हजारांपेक्षा अधिक वीजजोडण्या देण्यात आल्या. नवीन ८५६ रोहित्रे बसविण्याचे उद्दिष्ट चालू वर्षांत आहे. याशिवाय इन्फ्रा योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांत जवळपास साडेआठशे नवीन रोहित्रे बसवून ६ हजार कृषी पंपांना जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्य़ातील १ लाख ३ हजार घरगुती वीजग्राहकांकडे ४० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे, तर ६ हजारांपेक्षा अधिक व्यापारी ग्राहकांकडील थकबाकी तीन कोटींपेक्षा अधिक आहे. जिल्ह्य़ातील ८६३ पाणी योजनांकडे १० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. संपूर्ण जिल्ह्य़ासाठी महावितरणचे एकच मंडल आहे. जालना मंडलाचा समावेश असलेल्या औरंगाबाद परिमंडलात औरंगाबाद ग्रामीण व औरंगाबाद अशी अन्य दोन मंडले आहेत. औरंगाबाद परिमंडलातील एकूण वीज ग्राहकांची संख्या ४ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक असून यातील २ लाखांपेक्षा अधिक कृषी पंपधारक, तर औद्योगिक ग्राहक ५ हजारांपेक्षा अधिक व २ लाख ४४ हजार घरगुती ग्राहक आहेत. औरंगाबाद परिमंडलातील व्यापारी ग्राहकांची संख्या २८ हजारांपेक्षा अधिक आहे.