रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ६७ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २७ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा १११७ वर पोहोचला आहे. तर रविवारी उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ६७ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ३०, पनवेल ग्रामिणमधील १०, उरणमधील ३, कर्जत १,  अलिबाग १, मुरुड ४, माणगाव २, तळा ४, रोहा १, म्हसळा १०, महाडमधील १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात महाड, म्हसळा आणि अलिबाग येथील रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात २७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ३८०२ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील २५६६ जणांचे अहवाल नकारात्मक आले. १११७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ११९ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ६१६ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ४५१ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १८९, पनवेल ग्रामिण हद्दीतील ६३, उरणमधील २३,  खालापूर ७, कर्जत २२, पेण ९, अलिबाग २९,  मुरुड १३, माणगाव ३४, तळा येथील ७, रोहा १९, सुधागड १, श्रीवर्धन ४, म्हसळा १७, महाड १, पोलादपूरमधील १२ करोना बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ३२ हजार ७१८ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.