News Flash

Coronavirus – राज्यात दिवसभरात ६७ हजार १६० नवीन करोनाबाधित, ६७६ रूग्णांचा मृत्यू

आज ६३ हजार ८१८ रूग्ण करोनातून बरे देखील झाले.

संग्रहीत छायाचित्र

राज्यातील करोना संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सध्यातरी काहीसे कमी दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १६० नवीन करोनाबाधित आढळून आले. तर, ६७६ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७६ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज ६३ हजार ८१८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.०२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 9:53 pm

Web Title: 67160 new covid19 cases and 676 deaths were reported in maharashtra in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 यवतमाळ : कोविड केअर सेंटरमधून २० करोनाबाधितांचे पलायन!
2 अखेर महाराष्ट्राला केंद्राकडून रेमडेसिविरचा जादा पुरवठा!
3 मृतदेह बेपत्ता प्रकरण : मारोती ऐवजी रोशनवरच झाले अंत्यसंस्कार!
Just Now!
X