News Flash

महाराष्ट्रात ६ हजार ७४१ नवे करोना रुग्ण, २१३ रुग्णांचा मृत्यू

४ हजार ५०० रुग्णांना मागील चोवीस तासांमध्ये डिस्चार्ज

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ६ हजार ४७१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात ४ हजार ५०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ लाख ४९ हजार ७ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५५.६७ टक्के झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही २ लाख ६७ हजार ६६५ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ७ हजार ६६५ अॅक्टिव्ह आहेत. तर १ लाख ४९ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ आत्तापर्यंत १० हजार ६९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज १ लाख ७ हजार ६६५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ६६५ इतकी झाली आहे.

प्रमुख शहरांमधली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई – २२ हजार ७७३
ठाणे- ३४ हजार ६
पुणे -२३ हजार ७३८
कोल्हापूर-४७१
नाशिक- २९२२
औरंगाबाद-३८२५
नागपूर – ७२९

 

या शहरांमध्ये वाढला लॉकडाउन

पुणे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी लॉकडाउन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर रायगडमध्येही आजच लॉकडाउन आणखी १० दिवसांनी वाढवण्याची घोषणा झाली आहे. एकीकडे देश अनलॉकच्या दिशेने पावलं टाकतो आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील शहरांमध्ये लॉकडाउन होतं आहे. काही शहरांमधून लॉकडाउनला विरोध होतो आहे.

प्रशासनाने काय आवाहन केलंय?

गरज असेल तरच घराबाहेर पडा, घराबाहेर पडताना मास्क वापरा. बाहेर वावरताना सोशल डिस्टन्सिंग पाळा. बाहेरुन घरी आल्यानंतर सॅनेटायझरचा वापर करा. हात-पाय साबण लावून स्वच्छ धुवा. करोनाची लक्षणं दिसत असल्यास तातडीने टेस्ट करा. या आणि अशा सगळ्या सूचना प्रशासनाने जनतेला केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 8:26 pm

Web Title: 6741 new covid19 positive cases 4500 cases of discharge and 213 deaths reported in maharashtra today scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साताऱ्यात पुन्हा टाळेबंदीची घोषणा
2 करोनाकाळातील लग्नसोहळा पडला महागात; दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल
3 चंद्रपूर: सिंदेवाहीच्या राईस मिलमध्ये आढळला वाघ, एका कर्मचाऱ्याला केले जखमी
Just Now!
X