अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करोनाने शिरकाव केला आहे. कारागृहातील कैदी व कर्मचारी मिळून एकूण ६९ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर नेऊली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.

अलिबाग मधील करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक करोना रुग्ण सध्या अलिबाग तालुक्यात आहेत. १ हजार २१२ करोनाबाधिंतावर उपचार सुरु आहेत. यात सोमवारी आणखी १०१ जणांची भर पडली आहे. चिंताजनक बाब म्हणजे यात जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  रविवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था

यामध्ये करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या सर्वांना नेऊली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बहुतांश रुग्णांना करोनाची कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत उपचार सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.