महाराष्ट्रात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ झाली आहे. सात रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे.

करोनाचा प्रादुर्भाव हा संसर्गाद्वारे होतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील करोनाबाबत किंवा इतर महत्त्वाच्या विषयांबाबत जेव्हा बैठका घेतात तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसतात. त्यासंदर्भातले फोटोही व्हायरल झाले आहेत. आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या १९३ वर गेली आहे. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं आहे.