06 July 2020

News Flash

गुहागरच्या समुद्रात सात जण बुडाले, मुंबईच्या पाच जणांचा समावेश

कोकणातील गुहागर येथील समुद्रात शनिवारी सातजण बुडाल्याची दुर्देवी घटना घडली

कोकणातील गुहागर येथील समुद्रात शनिवारी सातजण बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. यापैकी तिघांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून अन्य चौघांचा शोध सुरू आहे. या सातजणांमध्ये मुंबईच्या चेंबूर भागात राहणाऱ्या शेख कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. शेख कुटुंबिय सुट्टीसाठी गुहागर येथे राहणाऱ्या त्यांच्या चांडा या नातेवाईकांकडे गेले होते. आज दुपारी हे सर्वजण मौजमजेसाठी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण समुद्रात ओढले गेले. यामध्ये शेख कुटुंबातील पाचजण आणि चांडा कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. आत्तापर्यंत महमंद शेख , सुफियाना शेक, झोया शेख यांचे मृतदेह मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 5:26 pm

Web Title: 7 people drown in guhagar sea
टॅग Holiday,Konkan,Mishap
Next Stories
1 समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत २८ सप्टेंबरपर्यंत वाढ
2 ”सनातन’च्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी डाव्यांकडे अख्खा नक्षलवाद’
3 गैरव्यवहारांची चौकशी सुरू असलेले बडे नेते मला भेटायला येतात- चंद्रकांत पाटील
Just Now!
X