News Flash

धुळे : उसतोड कामगारांच्या टेम्पोला भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू

बोरी नदीच्या पुलावर घडला अपघात, १५ जखमी

उसतोडीच्या कामासाठी उस्मानाबाद येथे जाणाऱ्या, कामगारांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पो नदीत कोसळल्यामुळे ७ कामगारांचा मृत्यू झाला असून १५ जणं जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला.

अपघातातील मयत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्याचे रहिवासी असल्याचं कळतंय. अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्यामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. या अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी जखमींना पाण्यातून बाहेर काढत, नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 10:19 am

Web Title: 7 people killed and more than 15 injured after a pick up vehicle fell off a bridge in a river near vinchur in dhule psd 91
Next Stories
1 राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो : अजित पवार
2 भाजपा समर्थकांसाठी शिवसेनेतर्फे मोफत बरनॉल वाटप
3 महाविकास आघाडीची आज अग्निपरीक्षा; विश्वासदर्शक ठराव मांडणार
Just Now!
X