21 September 2018

News Flash

उमरखेडमध्ये आश्रम शाळेतील ७ वर्षांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

उमरखेडचे भाजपचे माजी आमदार उत्तम इंगळे यांची ही आश्रम शाळा

ढाणकीतील आदिवासी आश्रम शाळेत शिकणारा प्रदीप शेळके हा मुलगा रविवारपासून बेपत्ता होता

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात आश्रमशाळेतील सात वर्षांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रदीप शेळके असे या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि सुरक्षारक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

HOT DEALS
  • Sony Xperia XA1 Dual 32 GB (White)
    ₹ 17895 MRP ₹ 20990 -15%
    ₹1790 Cashback
  • Samsung Galaxy J6 2018 32GB Black
    ₹ 12990 MRP ₹ 14990 -13%

ढाणकीतील आदिवासी आश्रम शाळेत शिकणारा प्रदीप शेळके हा मुलगा रविवारपासून बेपत्ता होता. सोमवारी संध्याकाळी गावातील कोरड्या तलावाच्या पात्रात प्रदीपचा मृतदेह आढळला. या प्रकरणाने खळबळ उडाली असून बिटरगाव पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
दुसरीकडे आदिवासी विभागाने शाळेच्या मुख्याध्यापिका एम. एम कुंभारे, शिक्षक गणेश वानखेडे आणि चौकीदार संतोष फुलकाणे या तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. उमरखेडचे भाजपचे माजी आमदार उत्तम इंगळे यांची ही आश्रम शाळा आहे. प्रदीप आश्रमशाळेबाहेर कसा गेला, त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

First Published on November 14, 2017 10:33 pm

Web Title: 7 year old boy from bjp ex mlas residential school for tribals in umarkhed dies in suspicious circumstances