News Flash

अक्कलकुवा येथे चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या, ग्रामस्थांचा पोलीस ठाण्याला घेराव

अक्कलकुवा येथील सोरापाडा येथे मंगळवारी रात्री सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

नंदुरबारमधील अक्कलकुवा येथे सात वर्षांच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कमलसिंग कर्तारसिंग सिकलीकर (वय ३२) याला अटक केली आहे. बुधवारी सकाळी संतप्त पालकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून नराधमाला फाशी देण्याची मागणी केली.

अक्कलकुवा येथील सोरापाडा येथे मंगळवारी रात्री सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती. पीडित मुलगी ही मंगळवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता होती. नराधमाने संध्याकाळी अंधार पडल्यावर तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने मुलीची हत्या केली. पीडित मुलीचे आई- वडील उत्तर प्रदेशचे असून ते सात वर्षांपासून अक्कलकुवा येथे राहत आहेत. ते दोघेही मजुरीचे काम करतात.

या घटनेनंतर बुधवारी सकाळी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच पोलीस ठाण्याला घेराव घालून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली. पोलिसांनी बलात्कार व हत्येप्रकरणी कमलसिंग कर्तारसिंग सिकलीकर याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 1:53 pm

Web Title: 7 year old girl raped and murder in akkalkuva angry parents protest at police station
Next Stories
1 बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन
2 मराठा आरक्षण: मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करा: हायकोर्टाचे निर्देश
3 मेळघाटात पहिल्यांदाच आदिवासी- वनविभागात सशस्त्र संघर्ष, जाणून घ्या कारण
Just Now!
X