भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६९ वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्य़ात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माणमंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती  चित्रा पाटील, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पोलीस उपनिरीक्षक परेड कमांडर सुनील जायभाय यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस दलाच्या पथकांनी पालकमंत्री महोदयांना मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री मेहता यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्य़ातील सर्व नागरिकांना हार्दकि शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्यलढय़ात आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसनिकांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले, महाड येथील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती. या घटनेबद्दल राज्यातच नव्हे तर देशभरात शोक व्यक्त केला. त्यानंतर मंत्री महोदयांनी व उपस्थितांनी महाड येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते या वेळी विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक-२०१६ व राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले असे नारायण वारे (उपनिरीक्षक माणगांव पोलीस ठाणे), गुरुनाथ माळी (पोलीस हवालदार-दहशतवादविरोधी पथक), राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एन.टी.एस. सन-१४-१५) इयत्ता दहावीसाठी राष्ट्रीय स्तर परीक्षेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कु. वैशाली बौद्ध आर.सी.एफ. सेकंडरी हायस्कूल कुरुळ-अलिबाग, कु. मिहिर चवरकर- सेंट जोसेफ स्कूल, नवीन पनवेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभार्थी-  सुहानी पाटील, आशा गावंड, स्नेहा खांदेकर, क्रांती भिवंडे, आशिका मणियार यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

या समारंभासाठी स्वातंत्र्यसनिकांच्या पत्नी, जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र दंडाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, चिटणीस श्री. देशमुख, जिल्ह्य़ातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.नेरळ येथे रात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले, तर मुरुड येथे आझाद चौक आणि तहसील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मोठय़ा संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सिंधुदुर्गात स्वातंत्र्य दिन साजरा

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण येथील प्रांताधिकारी कार्यालयात विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तहसीलदार सतीश कदम, अण्णा केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे, तसेच शासकीय अधिकारी, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.