News Flash

नगरमध्ये पतसंस्थेवर ७१ लाखांचा दरोडा

तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील मध्य वस्तीतील भगवतीमाता पतसंस्थेत बुधवारी भरदुपारी दीडच्या सुमारास चोरटय़ांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे ७१ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

| January 17, 2013 05:22 am

तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील मध्य वस्तीतील भगवतीमाता पतसंस्थेत बुधवारी भरदुपारी दीडच्या सुमारास चोरटय़ांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे ७१ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून दरोडेखोरांनी कार्यभाग साधला. लॉकरमधील सुमारे ७० लाखांचे सोन्याचे दागिने व एक ते दीड लाखांची रोकड लांबवण्यात आली आहे.  
सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा बहाणा करून हे दरोडेखोर संस्थेत आले व नंतर पिस्तुलाचा धाक दाखवून तिजोरीच रिकामी केली. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्य़ातील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती.
 अवघ्या पंधरा मिनिटांत चोरटय़ांनी त्यांचा कार्यभाग साधून पलायन केले. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काही दिवसांत जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांच्या कार्यक्षमेतबद्दलच आता संशय व्यक्त होऊ लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 5:22 am

Web Title: 71 carod robary on credit society in nagar
Next Stories
1 सिंधुदुर्गातील बांधकामांची कामे रखडली..
2 आरोंदा-किरणपाणी पुलाची गोव्यातील कामे लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश
3 सावंतवाडी येथे २० जानेवारी रोजी निमंत्रितांचे कवयित्री संमेलन
Just Now!
X