लांजा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४ जणांनी माघार घेतल्यामुळे आता १७ जागांसाठी ७३ उमेदवार िरगणात राहिले आहेत. दरम्यान शिवसेनेच्या महिला शहर संघटक संध्या संतोष कनावजे व युवा नेते रवींद्र कांबळेसह काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात केलेल्या बंडखोरीचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे. भाजप व शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची केवळ तीन प्रभागांमध्ये आघाडी झालेली आहे.
लांजा नगर पंचायतीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असून, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १४ जणांनी माघार घेतल्याने आता १७ जागांसाठी एकूण ७३ उमेदवार िरगणात राहिले आहेत.
शिवसेना, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वबळ अजमावत असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे दिसून येते. मात्र यापकी कोणताही पक्ष सर्व जागा लढवताना दिसत नाही. शिवसेना १६, काँग्रेस १५, भाजप १४ व राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागा लढवत असून, उर्वरित १७ उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांसह अपक्षांचा समावेश आहे.
प्रभागवार उमेदवार संख्या
प्रभाग क्रमांक १, २, ३ व ५ मध्ये प्रत्येकी पाच, प्रभाग ४ व ९ मध्ये प्रत्येकी सहा, प्रभाग क्र. ६, ७, १५ व १६ मध्ये प्रत्येकी तीन, प्रभाग क्र. ८, १०, ११, १२ व १४ मध्ये प्रत्येकी चार, प्रभाग १३ मध्ये सात व प्रभाग क्र. १७ मध्ये २ याप्रमाणे १७ जागांसाठी एकूण ७३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
१७ पकी ९ जागा महिलांसाठी राखीव
लांजा न.पं.च्या १७ पकी तब्बल ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्र. १, ३, ४, ९ व १४ (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्र. ७ (अनुसूचित महिला), प्रभाग क्र. ६, १० व ११ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) या ९ जागा महिलांसाठी, तर प्रभाग क्र. २, ५, ८, १३, १६ व १७ हे पाच प्रभाग अनारक्षित (ओपन) असून प्रभाग क्र. १२ व १५ हे दोन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
येत्या १८ जानेवारीला ही निवडणूक होणार असून शिवसेना, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी हे प्रमुख चार राजकीय पक्ष आपापले स्वबळ अजमावणार आहेत. शिवसेनेने सर्वाधिक १६ उमेदवार िरगणात उतरविले असले, तरी पक्षाच्या महिला शहर संघटक संध्या कनावजे, युवा नेते रवींद्र कांबळे यांच्यासह काहींनी केलेली बंडखोरी सेनेला मारक ठरणार आहे. तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या बंडखोरांची समजूत काढण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र. १५, १६, १७ मध्ये आघाडी केली आहे. प्रभाग १३ मध्ये सर्वाधिक ७, तर प्रभाग क्र. १७मध्ये सर्वात कमी २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2015 3:15 am