02 March 2021

News Flash

बोडणी गावात करोनाचे ७७ रुग्ण

गावातील १०० टक्के लोकांची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे क्रिकेट बोर्ड एका दौऱ्यावर जाताना मोठा संघ पाठवत आहेत.

अलिबाग तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. तालुक्यातील बोडणी हे गाव करोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. तीन दिवसांत गावात ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावातील बाधित रुग्णांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. गावातील १०० टक्के लोकांची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे १९ जुलैला १७, २० जुलैला २० तर २१ जुलैला १८ करोनाबाधित आढळून आले आहेत. गावातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.  उरण तालुक्यातील करंजानंतर बोडणी गावात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गावात मोठय़ा प्रमाणात समुह संसर्ग झाल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे गावात व्यापक प्रमाणात शोध, तपासणी आणि उपचार मोहिम सुरु करण्यात आली आहे.

तालुक्यात मंगळवारी ४४ नवे रुग्ण आढळून आले. यात अलिबाग शहर, चेंढरे, चोंढी, बोडणी, थेरोंडा, कार्लेखिंड, सागाव, चिंचोटी, झिराडमधील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ७३९ वर पोहोचली आहे. यातील ३५२ रुग्ण करोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर १९ जणांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. ३६८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांनाही करोनाची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले. या दोघांची त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलन करण्याचे काम सुरु असल्याचे तहसिलदार सचिन शेजाळ यांनी सांगीतले.

बोडणीत १०० टक्के लोकांचे स्क्रीनिंग होणार – जिल्हाधिकारी

अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावातील १०० टक्के लोकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांची करोना चाचणी करणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे सुरु झाले आहे. याकाळात गावात कडक निर्बंध लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:17 am

Web Title: 77 patients of corona in bodani village abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्षभरानंतर चिमुकलीच्या अपहरणकर्त्यांचे रेखाचित्र तयार
2 फांदी तोडल्याने २४ पेक्षा अधिक बगळ्यांच्या पिलांचा मृत्यू
3 … तर राममंदिराचंही प्रतीकात्मक भूमिपूजन करायला सांगा : इम्तियाझ जलील
Just Now!
X