03 June 2020

News Flash

लातूरमध्ये करोनाचे ७९ रुग्ण

उदगीर शहरातील करोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली आहे.

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या आता ७९ वर पोहोचली आहे. जिल्ह्य़ातील सात तालुक्यातील ही संख्या असून शिरूर अनंतपाळ, देवणी व औसा या अन्य तीन तालुक्यांत अद्याप करोना रुग्ण आढळलेले नाहीत.

उदगीर शहरातील करोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. निलंगा तालुक्यातील संख्या १८ झाली असून त्यात ८ आंध्र प्रदेशातील प्रवाशांचा समावेश आहे. लातूर तालुक्यात ३, त्यात शहर माळेगल्ली १ व बोरगाव काळे २, जळकोट २, अहमदपूर ३, चाकूर १, रेणापूर १ याशिवाय परजिल्ह्य़ातील दोघे असून त्यात कळंब तालुक्यातील शिराढोणची एक महिला व बीदर जिल्ह्य़ातील आळवाईचा एका रुग्णाचा समावेश आहे.

बीदरचा ६५ वर्षीय रुग्ण आठ दिवसांपूर्वी लातुरातील लेबर कॉलनी या भागात नातेवाइकाकडे आला व त्याच्या नाकावरील शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात तो दाखल झाला. तेथे त्याची करोनाची चाचणी करण्यात आली होती. लेबर कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. १०० मीटरचा परिसरात रस्त्यावर पत्रे ठोकण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर फवारणी करून र्निजतुक करण्यात आला असून घरोघर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. या परिसरासाठी स्वतंत्र पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला.

याच पद्धतीने पानगाव, कोराळी, कासारशिरसी, लांबोटा, खंडाळी, वडवळ नागनाथ, गव्हाण, उदगीर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात कडक उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत. करोनाबाधितांची संख्यावाढ मुंबईहून लातुरात दाखल झालेल्या लोकांमुळे होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाने परवानगी दिल्याने मूळचे लातूरचे व मुंबई, पुण्यात नोकरी, व्यवसायानिमित्त राहणारी मंडळी आपआपल्या गावी येत आहेत व अशाच लोकांमध्ये करोनाची बाधा मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 12:42 am

Web Title: 79 patients of corona in latur abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 दारूच्या नशेत मित्राचा खून, एकास अटक
2 अमरावतीत करोनाचा पंधरावा बळी
3 वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्याबाबत संभ्रम
Just Now!
X