पुण्यातील नारायणगावजवळ एसटी आणि टेम्पोचा अपघात झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटाजवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवाजीनगर आगारातील ञ्यंबकेश्वर-पुणे ही बस पुण्याकडे जाण्यासाठी निघाली होती. रात्री दीडच्या सुमारास ही बस पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ पोहोचली.रस्त्याच्या कडेला कांद्याच्या गोणीने भरलेला टेम्पो थांबला होता. टेम्पोचा टायर पंक्चर झाला होता आणि चालक टायर बदलण्याचे काम करत होता. भरधाव एसटीच्या चालकाला या टेम्पोचा अंदाज आला नाही आणि एसटीने टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका प्रवाशाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात १३ जण गंभीर जखमी आहेत. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला.

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Mumbai Police, Sub Inspector, police Dies in Accident, Pune Mumbai Expressway, panvel, panvel news, accident news, accident on Pune Mumbai Expressway, Pune Mumbai Expressway accident,
मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू
mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे:

> शोभा नंदू पगार (वय-४५) मु- उतराने, बागलाल सटाणा.

> यमुना बिला पगार, (वय ५५), सटाणा

> संकेत दत्तात्रय मिस्त्री, गणेशचौक, सिडको नाशिक

> विकास चंद्रकांत गुजराथी (वय ५०) गंगावेश, सिन्नर

> सागर कृष्णलाल चौधरी (वय ३०)

> अभिशेक जोशी

> कैलाश विठ्ठल वायकर

> किशोर यशवंत जोंधळे (वय ४०), कोकणगाव संगमनेर, टेम्पो क्लीनर

> जाकीर गुलाब पठाण ( वय ३०), टेम्पो चालक

जखमी प्रवाशांची नावे

भोसले हॉस्पिटल
> नंदू सीताराम पगार (वय ५८)

> संतोष जयसिंग गुलदगड (वय ३२)

> दीपक चंद्रकांत लांडगे (वय ३१)

> संतू तुळशीराम बावसार (वय ५२)

> तुकाराम जंग्या पावरा (वय ५६)

> सूर्यकांत धोंडीराम घाडगे (वय ५७)

नारायणगाव ग्रामीण हॉस्पिटल
> गणेश एकनाथ घोंगडे (वय २५), भोसरी, उपचार करून सोडले

> रमेश रामदास शेळके (वय ४४)

> ज्ञानेश्वर रमेश शेळके

धांडे हॉस्पिटल
> अरुण लक्ष्मण शिंदे (वय २३)

> सुधीर बागवाने (वय ४९)

> तुषार दशरथ करळे (वय २९)

> प्रवीण गमसेवक दुबे (वय ३८)