26 October 2020

News Flash

पेट्रोल-डिझेलला सोन्याचा भाव, नाशिकमध्ये 80 लीटर डिझेल चोरीला

पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे

रोज वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलला सध्या सोन्याचा भाव आला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चोरांचंही लक्ष सध्या डिझेल आणि पेट्रोलवर आहे. नाशिकमध्ये चोरांनी चक्क 80 लीटर डिझेल चोरी केलं आहे. तिघा चोरांनी हरियाणाचे ट्रक ड्रायव्हर भीम चंदनसिंह याला मारहाण करत त्याच्या ट्रकमधील 80 लीटर डिझेल काढून घेत टाकी मोकळी केली. अंबडमधील चंचले शिवार परिसरात हा प्रकार घडला.

चोरांची ओळख पटली असून ज्ञानेश्वर अंबोरे (30), नितेश कल्याणकर (22) आणि जेम्स मार्टिन (38) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.

चंदनसिंह यांनी रविवारी एका रेस्टॉरंटसमोर आपला ट्रक पार्क केला होता. त्यावेळी दुचाकीवरुन तिघे आले आणि अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका आरोपीने त्यांच्याकडून ट्रकची चावी काढून घेतली आणि ट्रक तीन किमी लांब चंचले शिवारात नेला. इतर दोन आरोपींनी चंदनसिंह यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून ट्रकच्या मागून नेलं.

तिघांनी मिळून ट्रकमधील 80 लीटर डिझेल काढून घेतलं. चंदनसिंह यांना यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन यासंबंधी तक्रार केली. पोलिसांनी तपास करत तिघा चोरांना अटक केली आहे. ‘त्यांनी विकण्यासाठी किंवा खासगी वापरासाठी डिझेल चोरलं असावं. आम्ही तपास करत आहोत’, अशी माहिती पोलीस उपनिऱीक्षक मिथून म्हात्रे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 10:13 am

Web Title: 80 litres diesel theft in nashik
Next Stories
1 जिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत
2 सरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना
3 मुलांना लैंगिक धडे देणाऱ्या शिक्षकास पालकांची मारहाण
Just Now!
X