महाराष्ट्रात करोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत अशी माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसंच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ अॅक्टिव्ह केसेस आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात करोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे पाचवरुन १४ दिवसांवर आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ही ५२ हजारांच्याही पुढे गेली आहे. मात्र कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार ५२ हजार ६६७ इतकी करोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १५ हजार ७८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ३५ हजार १७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही माहिती काल आरोग्य विभाग आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. दरम्यान महाराष्ट्रातला डबलिंग रेट हा १४ दिवसांवर गेला आहे असं आता अजॉय मेहतांनी सांगितलं आहे. तसंच महाराष्ट्रातल्या करोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे लक्षणं नसलेले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.