सोलापुरात आज रात्री नऊ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी ८१ नवे करोनाबाधित आढळून आले. तर सहा जणांचा मृत्यू झाला. एकूण रूग्णसंख्या ७४८ वर पोहोचली असून, आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडाही ७२ झाला आहे.
आज करोनाशी संबंधित २६८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यात ३८ पुरूष व ४३ महिलांसह ८१ रूग्ण सापडले. तसेच चार पुरूष व दोन महिलांसह सहाजणांचा मृत्यू झाला. मृत हे ५७ ते ७४ वर्षे वयोगटातील आहेत. आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये ग्रामीण भागातील चौघेजण आहेत. शहरातील जुना पुणे नाका येथील सातजण करोना पॉझिटिव्ह आढळले.
राज्यात आज 2 हजार 598 करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. याचबरोबर एकूण संख्या आता 59 हजार 546 अशी झाली आहे. तर दुसरीकडे आज 698 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत उपचारानंतर बरे होऊन घरी पाठविण्यात आलेल्यांची संख्या एकूण 18 हजार 616 झाली आहे. सद्यस्थितीस राज्यात एकूण 38 हजार 939 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 9:45 pm