10 August 2020

News Flash

सोलापूर जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी ८१ टक्के मतदान

उद्या मंगळवारी मतमोजणी

नगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सहा जागांसाठी सोमवारी झालेल्या मतदानात ८१.२३ टक्के इतके मतदान झाले. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आमदार दीपक साळुंखे, अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदी दिग्गजांचे भवितव्य पेटीत बंद झाले.
ही निवडणूक एकतर्फीच असून यात सर्वच्या सर्व जागा सहज जिंकू, असा विश्वास खासदार मोहिते-पाटील यांनी सायंकाळी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
या निवडणुकीत एकूण ३ हजार ६८ मतदारांपकी २ हजार ४९२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८१.२३ आहे.
अक्कलकोटमध्ये शंभर टक्के म्हणजे ९२ पैकी ९२ मतदान झाले. तर सर्वात कमी ४२.७२ टक्के मतदान उत्तर सोलापुरात होऊ शकले. इतर तालुकानिहाय झालेले मतदान असे बार्शी- २५७ पकी २४९ (९६.८९ टक्के), करमाळा-१९१ पकी १५८ (८२.७२), माळशिरस- ४२४ पकी ३७४ (८८.२१), माढा-६१८ पैकी ४२९ (६९.४२), पंढरपूर- ३०७ पैकी २५५ (८३.६), मोहोळ-२५५ पैकी २५१ (९४.५१), मंगळवेढा-१५५ पैकी १३२ (८५.१६), सांगोला- ३४५ पैकी ३२८ (९५.६०) व दक्षिण सोलापूर-११५ पैकी १०२ (८८.७०).
उद्या मंगळवारी मतमोजणी होणार असून दुपारी निकाल घोषित होईल, असे निवडणूक अधिकारी बी. टी. लावंड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2015 2:25 am

Web Title: 81 per cent voting for six seats of solapur district bank
टॅग Voting
Next Stories
1 डॉक्टर दाम्पत्याच्या हत्याप्रकरणी बंद
2 दादा-बाबा, नंबर प्लेट.. वाहनधारकांविरुद्ध कारवाई
3 पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला सुरुवात
Just Now!
X