28 February 2021

News Flash

राज्यात चोवीस तासात ८,१४२ करोनाबाधितांची नोंद; १८० रुग्णांचा मृत्यू

दिवसभरात २३,३७१ रुग्ण बरे होऊन पोहोचले घरी

राज्यात चोवीस तासात ८,१४२ करोनाबाधितांची नोंद झाली असून १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३,३७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

गेल्या चोवीस तासातील नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १६,१७,६५८ वर पोहोचली असून आजवर ४२,६३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १४,१५,६७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान राज्यात अद्याप १,५८,८५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८७.५१ टक्के झाले आहे.

दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात १,६०९ रुग्ण आढळून आले. तर ४८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील एकूण २,४५,८७१ रुग्णांपैकी २,१५,२६९ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात आता १९,२४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर ९,८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 10:25 pm

Web Title: 8142 corona victims in the state in 24 hours 180 patients died aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आता महाराष्ट्रातही सीबीआयला संमतीशिवाय प्रवेश नाही! ठाकरे सरकारचा निर्णय
2 फडणवीस यांचं राजकारण इतकं खुनशी असेल याची…; अमोल मिटकरींचं टीकास्त्र
3 मुंबई बत्ती गुल : सात दिवसात अहवाल सादर करण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश
Just Now!
X