28 September 2020

News Flash

८३ वर्षीय आजी करोनामुक्त 

करोनाला घाबरून न जाता यशस्वी सामोरे जाण्याचा संदेश

संग्रहित छायाचित्र

स्वत:ची इच्छा शक्ती दृढ असेल तर करोनावर  मात करता येऊ  शकते.  श्रीवर्धनच्या ८३ वर्षीय आजींनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. २५ दिवस लढून करोनाशी लढा देऊन त्या पुर्ण बऱ्या झाल्या आहेत. सुनिता भोसले असे या आजींचे नाव आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी  त्यांच्यावर यशस्वी उपचार करून घरी पाठवले आहे. करोनाला घाबरून न जाता यशस्वी सामोरे जाण्याचा संदेश त्यांनी दिला.

८३ वर्षांच्या सुनीता भोसले यांच्यावर महाड येथील रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी रुग्णालयात त्यांना करोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना ५ जुलै रोजी अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोसले यांचे शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नातेवाईकांनीही त्याची आशा सोडली होती. पण डॉक्टरांनाही प्रयत्न सुरु ठेवले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ राजीव तांबाळे, डॉ. विक्रमजीत पाडोळे, डॉ अपूर्वा कुलकर्णी पाटील यांनी आजींना करोनामुक्त करण्यासाठी २५ दिवस अहोरात्र प्रयत्न केले. अखेर त्यांचे प्रयत्न फळाला आले, आजीनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर करोनावर मात केली. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज सुनीता भोसले यांना सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी आजींना पुष्पगुच्छ, गुलाब देऊन त्यांना निरोप दिला. यावेळी डॉ. राजीव तांबाळे, डॉ अपूर्वा पाटील, मेट्रेन मोरे आरोग्य सेवक, सेविका यांनीही आजींना निरोप दिला.

‘५ जुलै रोजी सुनीता भोसले यांना करोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत नाजूक असतानाही रुग्णालयाच्या डॉक्टरांनी योग्य उपचार करून आजींना करोनामुक्त केले आहे. ’

-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

‘माझ्या आईला करोना झाल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. आईच वय आणि त्यात करोना यामुळे आम्हाला आईची काळजी वाटत होती. मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आईवर योग्य उपचार करून आज तिला करोनामुक्त केले आहे. याबाबत मी आरोग्य यंत्रणेचे शतश: आभार मानत आहे.’

-श्रुती मंगेश आंबळे, मुलगी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:18 am

Web Title: 83 year old grandmother corona free abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना काळात उद्योगक्षेत्रांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री
2 रायगड जिल्ह्यात ३८८ करोनाचे नवे रुग्ण
3 शिक्षणाचा गाडा घसरला
Just Now!
X