07 August 2020

News Flash

महाराष्ट्रात ८ हजार ३४८ नवे करोना रुग्ण, संख्येने ओलांडला तीन लाखांचा टप्पा

मागील चोवीस तासांमध्ये ५ हजार पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात ८ हजार ३४८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १४४ मृत्यूंची नोंद ही गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार ३०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ९३७ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत १ लाख ६५ हजार ६६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आत्तापर्यंत ११ हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत १ लाख ६५ हजार ६६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५. ५ टक्के झाले आहे. आज राज्यात ८ हजार ३४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये १४४ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर ३.८५ टक्के झाला आहे. आजपर्यंत १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४५ हजार ५५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

प्रमुख शहरांमधले अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई – २३ हजार ९१७
ठाणे – ३७ हजार २९५
रायगड ४ हजार ८९५
पुणे – ३१ हजार ३८०
कोल्हापूर- ९३२
नाशिक-३ हजार ५२६
औरंगाबाद- ३ हजार ८५७
नागपूर १ हजार ३०

आज राज्यात ८ हजार ३४८ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येने ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ९३७ इतकी झाली आहे. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 8:52 pm

Web Title: 8348 new covid19 positive cases 144 deaths and 5307 discharged in maharashtra today positive cases in the state rises to 300937 scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल?
2 यवतमाळ : अर्धवेळ टाळेबंदीनंतरही रुग्णवाढ आणि मृत्यू सुरूच!
3 नागपुरातल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपबाबत फडणवीस यांचं अनिल देशमुखांना पुन्हा पत्र
Just Now!
X