महाराष्ट्रात करोनाचे ८ हजार ४९३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर २२८ रुग्णांचा मागील २४ तासांमध्ये करोनामुळे मृत्यू झाला आहे. ११ हजार ३९१ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ६ लाख ४ हजार ३५८ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख २८ हजार ५१४ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २० हजार २६५ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ५५ हजार २६८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचा मृत्यूदर हा सध्याच्या घडीला ३.३५ टक्के झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेला ३२ लाख ६ हजार २४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख ४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ लाख ५३ हजार ६५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ५५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात १ लाख ५५ हजार २६८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई – १७ हजार ७०४
ठाणे १९ हजार ८१८
पुणे ३९ हजार ४२४
सातारा २ हजार ७६७
कोल्हापूर ६ हजार ७०६
नाशिक ९ हजार ८८२
औरंगाबाद ५ हजार ९०४
नागपूर ६ हजार ९५९

आज नोंद झालेल्या २२८ मृत्यूंपैकी १७२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ३६ मृत्यू मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू ठाणे जिल्हा ९, पुणे ६, मुंबई २, बुलढाणा १, कोल्हापूर १, उस्मानाबाद अशी १ असे आहेत.