04 June 2020

News Flash

आंधळेवाडीला ८६ टक्के मतदान

चारही रस्त्यांवर नाकाबंदी, गावात मतदान केंद्राभोवती दोनशे पोलिसांचा खडा पहारा, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून अशा वातावरणात आंधळेवाडीत गुरुवारी ८५.९६ टक्के मतदान झाले.

| April 25, 2014 04:11 am

चारही रस्त्यांवर नाकाबंदी, गावात मतदान केंद्राभोवती दोनशे पोलिसांचा खडा पहारा, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून अशा वातावरणात आंधळेवाडीत गुरुवारी ८५.९६ टक्के मतदान झाले.  केंद्र बळकावल्याच्या गुन्हय़ात कोठडीत असलेल्या पाच आरोपींनीही बंदोबस्तात मतदान केले. बीड लोकसभा मतदारसंघातील आंधळेवाडी (तालुका आष्टी) येथे गेल्या १७ एप्रिलला जि. प.च्या मतदान केंद्रावर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भाजप समर्थकांनी मतदान केंद्र बळकावून मतदान केल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुरुवारी फेरमतदान झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2014 4:11 am

Web Title: 86 per cent voter turnout in andhalewadi
Next Stories
1 मतमोजणीआधीच काँग्रेसमध्ये कलगीतुरा
2 विदर्भातील वीज प्रकल्पांचे एकत्रित मूल्यमापन हवे
3 तोगडियांवर कठोर कारवाईची मागणी
Just Now!
X